जिवलग मित्र भाजपचे शहराध्यक्ष झाल्याने हेमंत बांदेकर सक्रिय….

जिवलग मित्र भाजपचे शहराध्यक्ष झाल्याने हेमंत बांदेकर सक्रिय….

दुराव्यासाठी कारणीभूत होती का व्यावसायिक स्पर्धा?

सावंतवाडी शहर भाजपचे अध्यक्षपद अलीकडेच हॉटेल व्यावसायिक उद्योगपती अजय गोंदावळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अजय गोंदावळे सारख्या मोठ्या उद्योगपतीकडे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या सावंतवाडी शहराचे नेतृत्व दिले गेले असल्याने समाजातील अनेक स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा भाजपचे नेते तसेच जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आणि माजी जि.प. आरोग्य, बांधकाम सभापती एकनाथ नाडकर्णी यांनी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, चेतन आजगावकर, आणि अजय गोंदावळे यांचे एकेकाळचे जिवलग मित्र हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते. हेमंत बांदेकर यांचे कुटुंब हे हिंदुत्ववादी त्यामुळे अजय गोंदावळे भाजपाचे पदाधिकारी झाल्यानंतर काही वर्षे एकमेकांपासून फारकत घेतलेले दोघे मित्र हेमंत आणि अजय पुन्हा एकदा एकत्र येताना दिसून आले.
एकेकाळी लंगोटीयार असलेले दोघे मित्र एकमेकांपासून दुरावले होते. अगदी कुठेही फिरायला जायचं असेल तर हेमंत आणि अजय यांची जोडी ठरलेलीच होती. परंतु मध्यंतरी हेमंत बांदेकर याने खासकीलवाड्यातील दुसऱ्या मित्रासोबत भागीदारी करत दाणोली येथे आंबोली घाटाच्या पायथ्याशी परमिटरूम सुरू केला आणि तिथेच मैत्रीत दुसरा निर्माण झाला होता. आंबोली घाटाच्या वर अजय गोंदावळे यांचा देखील स्वतःचा परमिटरूम होता. त्यामुळे कदाचित व्यावसायिक स्पर्धेतून दोघांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे खाजगीत बोलले जात होते. त्यानंतर सावंतवाडीतील सुधीर हा युवक अजय गोंदावळे यांचा जिगरी दोस्त म्हणून सोबत असायचा. संजू परब यांच्याशी वाढलेल्या मैत्रीनंतर मात्र अजय गोंदावळे राजकारणात प्रवेशकर्ते झाले, अल्पावधीतच भाजपाचे सावंतवाडी शहराध्यक्ष हे महत्वाचे पद मिळाले आणि एकेकाळचा जिवलग असलेला मित्र हेमंत बांदेकर पुन्हा एकदा जुन्या मित्राच्या जवळ आला त्यामुळे हा सावंतवाडीत चर्चेचा विषय ठरला आहे.
असं म्हणतात की मैत्रीचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा वेगळे असते, रक्ताचे नसले तरी जीवाला जीव देणारे असते. प्रत्येक गोष्ट सांगावी लागत नाही तर मित्राचा चेहरा पाहूनच सर्व काही समजते. परंतु कधीकाळी एकमेकांशिवाय दूर न राहणारे हेमंत आणि अजयचे मैत्रीचे नाते खरंच व्यावसायिक स्पर्धेतून दुरावले होते का? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा