*जागतीक साकव्य विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, ज्येष्ठ लेखक कवी माधव ग.सातपुते (विगसा) लिखीत अप्रतीम काव्यरचना*
*सुखावणारी सांजाळ*
********************
सरता दिवस , राहते उभी सामोरी सांज
जशी प्रसन्न प्राची , तशीच सांजही सुंदर
अंतरात भावनांची लोभस ती सोनसळी
जीवा सुखावणारी सांजाळ क्षितिजावर
सुखाचाच संसार , नाही कुणाशीही वैर
तृप्तले , सारे जीवन केले प्रेम सर्वावर
आता आठविती क्षण सारेच हरवलेले
होता आत्ममुख मन होई कातर कातर
आता न अंतरी सुखदुःखाचे मोजमापदंड
सारेच आपुले , हाच भाव जागो निरंतर
जगताजगता राखावित बहुतांची अंतरंगे
स्मरावी गीता , आणि रूप ते शामसुंदर
*****************************
*रचना क्र.३११/२८/११/२०२२*
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*