You are currently viewing संजू परब नाराज ?

संजू परब नाराज ?

भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत परब यांची अनुपस्थिती

 

सावंतवाडी :

 

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती होणार असल्याची घोषणा युतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब अनुपस्थित राहिले. सावंतवाडी तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे, त्यामुळे नेत्यांना आम्ही समजावू असं ते म्हणाले होते. दरम्यान, युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्वबळाचा नारा देणारे संजू परब नाराज झालेत का ? असं विचारलं असता “संजू परब हे नाराज नाही, प्रत्येकाचा दौरा ठरला आहे. गाव वाटून घेतली आहे, नाराजी वगैरे असं काहीही नसून सर्व सहकाऱ्यांसोबत बैठक घेत वरिष्ठांकडून आलेला निर्णय त्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे” अस मत तेलींनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =