You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शतप्रतिशत विजयी होईल – धोंडी चिंदरकर

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शतप्रतिशत विजयी होईल – धोंडी चिंदरकर

मालवण

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शतप्रतिशत यश संपादन करेल. असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर तालुका भाजप कार्यालय येथे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तालुक्यात सर्वच ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याविरोधात कोणी बंडखोरी केल्यास त्या बंडखोर उमेदवारांचे पक्षातून निलंबन करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवला जाईल. अशी स्पष्ट भुमिका पक्ष निरीक्षक अशोक तोडणकर यांनी मांडली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, मुन्ना झाड, युवा मोर्चा तालुका प्रभारी मंदार लुडबे, शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, सरचिटणीस निषय पालेकर, विलास मुणगेकर, विजय कदम, सुशील शेडगे, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी गावागावांचा आढावा घेत असताना तारकर्ली गावातील काही मुद्द्यांवर चर्चा झाली. यात तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजप शतप्रतिशत यश संपादन करेल. याठिकाणी असलेल्या सरपंच स्नेहा केरकर यांचा भाजप पक्षाशी अथवा भाजप पुरस्कृत पॅनेलशी कोणताही संबंध नाही असे श्री. चिंदरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 17 =