You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ज्युडो कराटे स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ज्युडो कराटे स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी

सावंतवाडी

संजू परब मित्र मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 43 वा वर्धापन दिना निमित्त जिल्हास्तरीय भव्य ज्युडो स्पर्धा उद्घाटन सोहळा आज सकाळी पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटक व अध्यक्ष निलेश राणे होते. प्रमुख पाहुणे सच्चिदानंद उर्फ संजू परब तसेच प्रमुख अतिथी अजय गोंदावळे, बंटी राजपुरोहित, डॉ. राजेशकुमार गुप्ता तसेच डॉ. प्रवीणकुमार ठाकरे होते. ही स्पर्धा आरपीडी हायस्कूल मैदान सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त केले. यामध्ये चौथीच्या वर्गातील आराध्या नाटेकर हिला गोल्ड मेडल, तर अस्मि प्रभूतेंडुलकर हिने सिल्वर मेडल प्राप्त केले. तसेच मानव साळगावकर, देवांश यादव सिल्वर मेडल, वैष्णव सावंत, सोहम देशमुख यांनी ब्राॅन्ज मेडल पटकावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + eleven =