You are currently viewing कसाल ग्रामपंचायत निवडणूकीत तिन्ही पक्षात होणार चुरशीची लढत

कसाल ग्रामपंचायत निवडणूकीत तिन्ही पक्षात होणार चुरशीची लढत

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सर्वांचे लक्ष असलेली कसाल ग्रामपंचायत निवडणूक मात्र यावेळी चुरशीची होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पार्टी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात खरी लढत होणार आहे. तर इतर ही उमेदवार उभे राहण्याचे जोरदार तयारीत आहे. तसेच काही अपक्ष ही निवडणूक लढवणार आहेत अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीत कोण होणार सरपंच याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील ५ वर्ष ग्रामपंचायत भाजपकडे होती. यावेळी बिनविरोध निवड होईल का हे सांगता येणार नाही. मागील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी ११ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे तर १ शिवसेना १ अपक्ष निवडून आले होते. यावेळी थेट सरपंच निवडणूक सुरक्षित होणार असून उमेदवार आपलं भवितव्य आजमावण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार आहे. येत्या काही दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवार कोणाविरुद्ध कोण हे सुद्धा स्पष्ट होईल तर काही माजी ग्रामपंचायत सदस्य ही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तशा निवडणूक जाहीर होताच वाढीवर प्रभाग बैठका सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कसाल ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =