You are currently viewing मोती तलाव मध्ये तेलकट हिरवा तरंग नष्ट करण्याची नगरपरिषदेने मोहीम घेतली हाती..

मोती तलाव मध्ये तेलकट हिरवा तरंग नष्ट करण्याची नगरपरिषदेने मोहीम घेतली हाती..

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातू दिलेल्या निवेदनाची नगरपरिषदेने घेतली दखल

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेला काल दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सावंतवाडी नगरपरिषदेने मोती तलाव मध्ये तेलकट हिरवा तरंग नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी सामाजिक बांधिलकी माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत.

हिरव्या तरंगामुळे मोती तलावाचे सौंदर्य नष्ट होत असल्याची चिंता व्यक्त करण सामाजिक बांधिलकीने सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन देऊन यावर त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =