You are currently viewing सिंधुदुर्ग राष्ट्रवादी एकसंघ, राष्ट्रवादी आता अधिक बळकट होणार; अमित सामंत

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी एकसंघ, राष्ट्रवादी आता अधिक बळकट होणार; अमित सामंत

*सिंधुदुर्ग राष्ट्रवादी एकसंघ, राष्ट्रवादी आता अधिक बळकट होणार; अमित सामंत*

*अमित सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी घेतली भेट*

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षसंघटनेबाबत चर्चा केली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर बदलत्या राजकीय परिस्थितीचा कोणताही परिणाम होणार नाही.सिंधुदुर्ग जिल्हा हा राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत असून भविष्यात संघटना आणखीन बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करु अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिलाध्यक्षा सौ अर्चना घारे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे चिटणीस रुपेश जाधव, कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर रोमन शेख अजीम शेख सुधीर कुबल सामाजिक न्याय विभाग सेल जिल्हाध्यक्ष दिपक जाधव कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर कणकवली शहर अध्यक्ष सागर वारंग विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतिक सावंत यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते,

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − one =