You are currently viewing संजय घोगळे यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

संजय घोगळे यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

महा आवास अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार

वेंगुर्ला

वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांनी महा आवास अभियान २०२०-२१ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना नुकतेच गौरविण्यात आले.

अमृत महा आवास अभियान २०२२-२३ ची राज्यस्तरीय शुभारंभ कार्यशाळा २४ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरियम, मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड.राहूल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात
महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही संपन्न झाला. या महा आवास अभियान २०२०-२१ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय अधिकारी म्हणून वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री.घोगळे हे सध्या अप्पर कोषागार अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =