You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी किरण शिंदे बिनविरोध…

कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी किरण शिंदे बिनविरोध…

कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी किरण शिंदे बिनविरोध…

कुडाळ

येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी ठाकरे शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे. कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्ष पदावर आज शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज कुडाळ नगरपंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी
उपनगराध्यक्षपदी” शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. नगराध्यक्ष अक्षता खटावकर, मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षा अक्षता खटावकर, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या अन्य नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा