You are currently viewing मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत कडेकोट बंदोबस्त…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत कडेकोट बंदोबस्त…

जिमखाना येथील मैदानाची पाहणी; पोलिस व जिल्हा प्रशासनाकडुन सुरक्षेचा आढावा

सावंतवाडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज या निमीत्ताने जिल्हा पोलिस प्रशासनाने जिमखाना येथील राजन तेेली यांच्या कुंटूबियांच्या नियोजित कार्यक्रमाच्या जागेची पाहणी करीत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांच्या मुलाचा स्वागत सभारंभ आज सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलिस प्रशासनाने आज शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तर दुसरीकडे नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणची पाहणी करण्यात आली.

यावेळी पोलिस उपअधिक्षक नितीन बगाडे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, तहसीलदार श्रीधर पाटील तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब,भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 12 =