You are currently viewing मळेवाड आरोंदा मार्गावरील रस्त्यालगतची झाडी तोडण्याच्या सुरुवात…

मळेवाड आरोंदा मार्गावरील रस्त्यालगतची झाडी तोडण्याच्या सुरुवात…

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे व मनसेच्या मागणीला यश…

सावंतवाडी

मळेवाड आरोंदा मार्गावरील रस्त्यालगतची झाडी तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हेमंत मराठे व मनसेच्या मागणीला यश आले आहे.मळेवाड गुळदुवे आरोदा मार्गावर फार मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली होती.या झाडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या बाजूने चालणे ही मुश्किल झाले होते.

त्यामुळे अपघाताची ही शक्यता असल्याने रस्ता दुजाभाव वाढलेली झाडी तात्काळ तोडावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत होती.यालाच अनुसरून रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तात्काळ तोडावी अशी मागणीमुळे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे व मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग च्या अधिकाऱ्यांकडे केली होती.आज सकाळपासून या मार्गावरील रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याने वाहनधारक व पादचारी यांच्यातून समाधान व्यक्त केले जात असून हेमंत मराठे व मनसेचे आभार व्यक्त केले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =