You are currently viewing फोंडाघाट मध्ये आज पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस

फोंडाघाट मध्ये आज पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस

जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस पडला. दुपारी २ वाजलेपासुन ५ वाजेपर्यंत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे फोंडाघाट मध्येही दरड कोसळेल अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या बंद मध्ये प्रशासन सुशागत असल्याचे जाणवले. ढगफुटी सदृष्य पडणाऱ्या पावसामुळे मागील पाच तास लाईट नाही. फोंडाघाट वासीय जीव मुठीत घेवुन राहात आहेत. रस्त्याची चाळण झाल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. असंवेदनशील प्रशासनाला कधी जाग येणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा