You are currently viewing जागतिक साकव्य विकास मंच समूहाच्या पाक्षिक कविकट्ट्याच्या अंतिम फेरीचा निकाल शनिवारी होणार जाहीर

जागतिक साकव्य विकास मंच समूहाच्या पाक्षिक कविकट्ट्याच्या अंतिम फेरीचा निकाल शनिवारी होणार जाहीर

*जागतिक साकव्य विकास मंच समूहाच्या पाक्षिक कविकट्ट्याच्या अंतिम फेरीचा निकाल शनिवारी होणार जाहीर*

जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित पाक्षिक कविकट्टा गेले वर्षभर आयोजित केला जात होता. प्रत्येक महिन्यातील पाक्षिक कविकट्ट्या मध्ये निवड होणाऱ्या स्पर्धकांची उपांत्य व अंतिम फेरी काहीच दिवसांपूर्वी पार पडली. पाक्षिक कविकट्ट्याच्या अंतिम फेरीचा निकाल येत्या शनिवारी दि.२६ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहे.
वर्षभर सातत्याने कवन श्रृंगारत साकव्य पाक्षिक कवी कट्ट्याची उपांत्य आणि अंतिम फेरी दिनांक १o, १२ व १४ नोव्हेंबर ला कवी, कवयित्री यांच्या उत्तम सादरीकरणा सह सानंद संपन्न झाली. येत्या २६ नोव्हेंबर, शनिवारी सायंकाळी ८.०० वाजता या साकव्य पाक्षिक कवी कट्ट्याचा निकाल जाहीर होणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना क्रमशः ₹१,५oo/-, ₹१ooo, ₹५oo/- आणि प्रमाणपत्र दिले जातील त्याशिवाय २ पुरस्कार उत्तेजनार्थ ही दिले जातील. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे यात रसग्रहण करणारे समीक्षक, समन्वयक, सूत्र संचालक, तंत्र सहायक हे सगळे कविता सादर करतील व प्रमुख पाहुणे रसग्रहणात्मक समीक्षण करतील. संपूर्ण महाराष्ट्रात साकव्य पाक्षिक कवी कट्ट्याची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे व २६ नोव्हेंबर शनिवार ला होणाऱ्या कार्यक्रमाची साकव्य सदस्यांसोबत यूट्यूब प्रेक्षकांना ही खूप उत्सुकता आहे.तुम्ही ही बघायला विसरू नका. कार्यक्रमाची लिंक…..👉🏼https://youtu.be/ujcSz8G8mOw

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =