You are currently viewing सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कणकवली

सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्ते शब्बीर खान, जमील खान, अजीम खान, इजास खान यांसह सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यानी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना पक्षवाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव, नगरसेवक उदय मांजरेकर, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, शेखर गवंडे, बाळू पालव, गुरु सडवेलकर,सोनवडे शाखा प्रमुख गुरू मेस्त्री, सोनवडे सोसायटी चेअरमन काशीराम घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडी, दीपक गंगाराम घाडी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 3 =