You are currently viewing वृत्तपत्रात आणि डिजीटल मिडीयात आलेल्या चुकीच्या बातमीचा खुलासा

वृत्तपत्रात आणि डिजीटल मिडीयात आलेल्या चुकीच्या बातमीचा खुलासा

सिंधुदुर्ग

22 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे काँग्रेस कार्यालयात संपन्न झाली. या सेभेमध्ये ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढविण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या सभेत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी करावी परंतू ही आघाडी सन्मानजनक असावी अशा प्रकारचे विचार मांडले. एकला चलोचा कोणताही नारा या सभेत देण्यात आला नाही. काही वृत्तपत्रात व डिजीटल मिडीयात आलेली एकला चलोची बातमी चुकीची आहे. 23 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती सदर सभेत महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे आणि तीनही पक्षाच्या अध्यक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून खुलासा करत आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवीले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा