You are currently viewing मराठी कवितेचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलीय- डॉ.महेश केळुसकर.

मराठी कवितेचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलीय- डॉ.महेश केळुसकर.

सुरेखा मालवणकर यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न

कल्याण :

संभ्रमात सापडलेल्या आणि गटबाजीत घुसमटलेल्या मराठी कवितेचाच जीर्णोद्धार करायची खरोखर वेळ आलेली आहे ,असे प्रतिपादन डॉ.महेश केळुसकर यांनी कल्याण येथे शुक्रवारी संध्याकाळी सुरेखा मालवणकर यांच्या ‘जीर्णोद्धार’ या काव्यसंग्रहाचे विश्लेषण करतांना केले. आजची मराठी समीक्षाही सांकेतिक झाली असल्याचा दावा करून तीमधील साक्षेप हरवल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कबीरापासून नारायण सुर्वे यांच्यापर्यंतच्या कवींनी आपण मंचीय कवी असल्याचा अभिमान बाळगला. त्यामुळे खरी कविता लिहून ती खरेपणाने लोकांसमोर सादर करण्यात कवींनी कितीही टीका झाली तरी न्यूनगंड बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले.
प्रा.प्रतिभा सराफ यांनी सुरेखा मालवणकर यांच्या कवितेत साधेपणात सौंदर्य ,अफाट शब्दसंमृद्धी तसेच चौफेर लिखाण असल्याचे नमूद करून त्यांच्या काही कविता वाचून दाखवल्या. लेखक- दिग्दर्शक मकरंद सावंत यांनी मालवणकरांच्या काव्यसंग्रहाचे शिर्षकात वैशिष्ट्य आहे असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. सार्वजनिक वाचनालय,कल्याण चे सरचिटणीस भिकू बारस्कर, गझलकार माधव डोळे, साहित्यिक बाळासाहेब तोरस्कर, प्रकाश पोळ आदी मान्यवर प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

सुरेखा मालवणकर यांच्या ” जीर्णोद्धार ” कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते झाले. सोबत डावीकडून कवी बाळासाहेब तोरस्कर, कवयित्री सुरेखा मालवणकर, कवयित्री प्रतिभा सराफ, लेखक भिकू बारस्कर व लेखक, दिग्दर्शक मकरंद सावंत .

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 14 =