You are currently viewing सिंधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्या. वेंगुर्ले पतपेढीची निवडणूक बिनविरोध…

सिंधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्या. वेंगुर्ले पतपेढीची निवडणूक बिनविरोध…

चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ. अंकिता बांदेकर यांची निवड

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्या. वेंगुर्ले या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमन पदावर श्री. बाबली रामा वायंगणकर यांची तर व्हाईस चेअरमन पदावर सौ. अंकिता आनंद बांदेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी या पतपेढीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड सहकार अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडली. संचालक मंडळावर संचालक म्हणून रमेश पुंडलिक नार्वेकर, श्रीकृष्ण दत्ताराम पेडणेकर, प्रकाश महादेव गडेकर, नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर, समाधान जयराम बांदवलकर, सौ. सारिका सतीश काळसेकर, जयराम शंकर वायंगणकर, जगन्नाथ गोपाळ डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड प्रक्रियेनंतर पतपेढीच्या मॅनेजर अनिता रेडकर, सुस्मिता परब, मेघना राऊळ, हेमंत साळगावकर या कर्मचाऱ्यांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. दरम्यान पतपेढीची स्थापना १९ मार्च १९९४ झाली. प्रथम संस्थापक अध्यक्ष कै. गोविंदराव भगवान पेडणेकर यांनी चालू केलेली ही पतपेढी आजपर्यंत योग्य दिशेने काम करत आहे. आज पर्यंतच्या सर्वच संचालकांनी पतपेढीची पत वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच काम आम्ही नवीन संचालक मंडळ करू असे आश्वासन चेअरमन बाबली वांगणकर यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =