You are currently viewing भात खरेदीसाठी सिंधुदुर्गातील ४१ खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू – अनिल देसाई

भात खरेदीसाठी सिंधुदुर्गातील ४१ खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू – अनिल देसाई

कणकवली

धान विक्री शेतकऱ्यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करणार आहे, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली.

खरीप पणन हंगाम २२ – २३ मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीकरीता ऑनलाईन पध्दीने शेतकरी नोंदणी करीता जिल्ह्यात ४१ ठिकाणी धान खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु आहे. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत सावंतवाडी,मळगाव,मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सुली, तळवडे, भेडशी. कुडाळ तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे, निवजे, आंब्रड, पिंगुळी, पणदूर, कडावल, तुळस, वेताळबांबार्डे, गोठोस, निरुखे,ओरास. कणकवली तालुका- शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि. कणकवली मार्फत कणकवली, लोरे नं.1, फोंडा, घोणसरी, सांगवे. वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. मालवण तालुका- खेरदी विक्री संघ लि. मार्फत कट्टा, पेंडूर, गोठणे, विरण, मालवण, मसुरे. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघ लि. मार्फत वैभववाडी, करुळ इत्यादी केंद्रावर नोंदणी सुरु आहे.

महा-नोंदणी ॲपवरती शेतकरी घरबसल्या स्वत: नोंदणी करु शकतात. (https://play.google.com/store/apps/details…) तरी शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ७ /१२ उतारा प्राप्त करुन घ्यावे. उताऱ्याबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ तहसिल कार्यालयासी संपर्क साधून ७ /१२ उतारे घेवून भात खरेदी केंद्रावर दि.३० नोव्हेंबर २०२२ अखेर नोंदणी करुन घ्यावी, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + fifteen =