You are currently viewing कुडाळात ऑपरेशन सिंदूर विजयाचा जल्लोष

कुडाळात ऑपरेशन सिंदूर विजयाचा जल्लोष

कुडाळ :

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे मध्यरात्री ९ दहशतवादी अड्डयावर हवाई हल्ला करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बुधवारी कुडाळ येथे भारतीय देशप्रेमींनी व नागरिकांनी हातात भारतीय झेंडे दाखवून, फटाके फोडून व घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी विवेक पंडित, मिलिंद देसाई, रमाकांत नाईक, बंड्या सावंत, मंगेश पावसकर, शिवम म्हाडेश्वर, राजू राऊळ, अविनाश पाटील, मंगेश पावसकर, नीलेश परब, गणेश भोगटे, संध्या तेर्से, सुनील बांदेकर, अदिती सावंत, अविनाश पाटील, राजू बक्षी, दैवेश रेडकर, नचिकेत देसाई, चेतन धुरी, सागर वालावलकर, रामा सावंत, घनश्याम परब आदी नागरिक उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या २६ पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानात एअर स्ट्राईक करीत तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत. या पार्श्वभूमीवर येथील राजमाता जिजाऊ चौकात देशप्रेमी व नागरीकांनी फटाके फोडून व घोषणा देत ऑपरेशन सिंदूरबाबत आनंदोत्सव साजरा केला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जयवान जय किसान’, ‘हिंदू धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आदी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा