You are currently viewing LIC कंपनी झाली मालामालं….गेल्या ६ महिन्यांमध्ये जनतेच्याच गुंतवणुकीवर मिळवला विक्रमी नफा….

LIC कंपनी झाली मालामालं….गेल्या ६ महिन्यांमध्ये जनतेच्याच गुंतवणुकीवर मिळवला विक्रमी नफा….

 

देशातली सगळ्या मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने गेल्या ६ महिन्यांमध्ये विक्रमी नफा कमावला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कंपनीला तब्बल १५ हजार कोटींचा फायदा झाला आहे. याव्यतिरिक्त २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे नफा आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला थेट १८,५०० कोटी रुपयांचा नफा झाला होता.

 

 

LIC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, कंपनीला मागच्या ६ महिन्यांमध्ये इंडियन शेअर मार्केटमध्ये तब्बल ५०,००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यामध्ये बाजार घसरल्याचं पाहायला मिळालं पण कंपनीने जशी इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवली तशी आज LIC कंपनी आज १५ हजार कोटी रुपयांच्या फायद्यामध्ये आहे.

 

कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यात मार्केट कोसळलं असताना कंपनीने गुंतवणूक केली आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला, असे   इकॉनॉमिक टाइम्सने वृत्तात म्हटले आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या ६ महिन्यांत इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बाँड्स आणि राज्य विकास कर्जांमध्ये २.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इतकंच नाही तर कंपनीने २ लाख कोटी रुपयांची आणखी एक गुंतवणूक योजना तयार केली आहे.

 

वास्तविक, ३० जून २०२० पर्यंत भारतीय शेअर बाजार कंपनीचं मुल्य ( value) ५.३४ लाख कोटी रुपये होतं. पण आता झालेल्या फायद्यामुळे ३१ मार्च २०२० ला कंपनीची व्हॅल्यू ४.५१ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

 

कंपनीने गेल्या तिमाहीत ५१ कंपन्यांमध्ये आपली भागिदारी वाढवली आहे. त्याचबरोबर ३० कंपन्यांमध्ये पदं कमी केली तर २२४ कंपन्यांच्या भांडवलात कोणताही बदल झालेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =