You are currently viewing “द केरला स्टोरी” सिनेमा पाहण्यासाठी महिलांची गर्दी..

“द केरला स्टोरी” सिनेमा पाहण्यासाठी महिलांची गर्दी..

आमदार नितेश राणेंकडून करण्यात आले होते महिलांसाठी मोफत सिनेमाचे आयोजन.

कणकवली

सध्या देशामध्ये घडत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांवर आधारीत बहुचर्चीत “द केरला स्टोरी” हा सिनेमा वास्तवदर्शी असून प्रत्येक महिला पालकांना पाहाता यावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. जास्तीत जास्त महिलांनी हा सिनेमा पाहणे अत्यंत जरूरीचे आहे. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केले होते. सिनेमा पाहण्यासाठी रविवारी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे दुपारी १२.३० वाजता महिलांसाठी द केरला स्टोरी हा शो मोफत दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

आमदार नितेश राणे यांनी स्वतः लक्ष्मी चित्रमंदिर येथे जात मोजक्या शब्दात मार्गदर्शन करून शो ची सुरुवात करून दिली. यावेळी सर्व उपस्थित माता भगिनींनि आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, संजना सदडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा