You are currently viewing नाबर प्रशालेत आयोजित भाजी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद….

नाबर प्रशालेत आयोजित भाजी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद….

बांदा

मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत आयोजित भाजी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी यावेळी मुलांना भाज्यांचे आपल्या आहारातील महत्व व उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.


यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध भाजी व त्या रंगांचे कपडे परिधान केले होते. यावेळी स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम दोन क्रमांकानुसार) ज्यु. केजी – मिताली साळगावकर, मायरा रॉड्रीग्स, सिनियर केजी -सार्थक वालावलकर, इयत्ता पहिली – कौशल मेस्त्री, सुयश परब, इयत्ता दुसरी – लिजा मारनेकर, तनिष्का महाले, इयत्ता तिसरी – स्टेला फर्नांडिस, तनिषा राऊळ, इयत्ता चौथी – हफसा शेख, यज्ञा वारंग.


यावेळी मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर, सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स, तेजस्वी गावडे, प्राची परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी गावडे यांनी केले. तर आभार प्राची परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =