You are currently viewing राज्यकर्त्या सरकारला प्रश्न विचारले तर क्रिमिनल रेकॉर्ड तयार करून गुन्ह्यात गोवले जाते – सुषमा अंधारे

राज्यकर्त्या सरकारला प्रश्न विचारले तर क्रिमिनल रेकॉर्ड तयार करून गुन्ह्यात गोवले जाते – सुषमा अंधारे

कणकवली :

कणकवलीत महाप्रबोधन यात्रेत महागाई, रोजगार या मुद्द्यांवर मोदी सरकारची अभ्यासपूर्ण चिरफाड करत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रातील भाजपा सरकारसह महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचे जाहीर वाभाडे काढले. पुढे बोलताना अंधारे यांनी देश सध्या भयंकर काळाच्या दारात उभा आहे.

ज्या भारत देशाची तुलना अमेरिका, रशिया सोबत होत होती ती आता कतार सोबत होते. महागाईच्या मुद्द्यावर 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी आता 2022 मध्ये 200 पट महागाई वाढली तर गप्प आहेत. भारताचा विकासदर साडे सहा टक्के असताना मोदींनी 10 टक्के चे गाजर दाखवले.प्रत्यक्षात सध्या केवळ पावणे दोन टक्के विकासदर आहे.

आज राज्यकर्त्या सरकारला प्रश्न विचारले तर तुमच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड तयार करून तुम्हाला गुन्ह्यात गोवले जाते. जेव्हा जनता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा द्वेषमूलक राजकारण करून धर्माच्या नावाखाली एकमेकांत लढवण्याचे उद्योग सुरू आहेत अशी टीका अंधारे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 11 =