You are currently viewing अमित ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार…

अमित ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार…

 

मुंबई:

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आली.

 

अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ग्राऊंडवर उतरुन अॅक्टिव्हपणे कामं करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, डॉक्टरांचे प्रश्न अशा विविध कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.

 

अमित ठाकरे यांनी आरे कारशेड कांजुरमार्गला हलवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

 

मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील २७०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 18 =