You are currently viewing नको गं…….बाई!

नको गं…….बाई!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक-कवी डॉ.जतीनबोस काजळे यांची बोधकथा*

*नको गं…….बाई!*

” का ….हो ! ”
“रूसलात का? ”
असे म्हणून, सिंहाने बसल्या बसल्याच सिंहनीला हळूवार पणे शेपूट मारले.
पण सिंहनी ने तोंडाने ‘पच्च् ‘ असा आवाज करत आपले तोंड दुसरी कडे वळवले.
सिंहाला प्रश्न पडला.
आता, बाईसायबाचा रुसवा कसा काढायचा.
काम तर कठीणच होते.
आत्ता पर्यत कधी सिंहीन रुसली तर तिला एखादा छान ससा आणून दिला किंवा छानसे हरिन आणून दिले की तिची तबीयत खुष व्हायची. रुसवा कुठले कुठे पळुन जायचा.
पण दोन दिवस झाले मामला वेगळाच होता.
दोन दिवसा पासून सिंह परेशान झाला होता. त्याचे शिकारी कडे लक्षच लागत नव्हते. कशी बशी एक शिकार सापडून त्याने गुहेत आणून टाकली .तर ,सिंहनी ने त्या कडे ढुकूंनही पाहीले नाही.एवढच नाही तर, ती तिच्या छोट्या छाव्यां कडेही लक्ष देत नव्हती.ते बिचारे उगीचच तिच्या आजुबाजूला घुटमळत होते.
असे एक दोन दिवस गेले.
आज सिंह नेहमी प्रमाणे जंगलात जावून फेरफटका मारुन परत आपल्या गुहेत आला. सिंहनीचा रुसवा आज कसे ही करुन काढायचा असे सिंहाने ठरवले. काहिही करून तिला रुसण्याचे कारण विचारायचेच.
सिंहीनेने सिंहाला आलेला पाहून न पाहील्या सारखे केले.
तोंड फुगवून ती तशीच पाय सरळ करुन उगीचच डोळे मिटवून पडली.
तो तिच्या जवळ जावून बसला व म्हणाला. “राणीसाहेब रुसल्या वाटतं आमच्यावर”.
“अँ हा…हा, अँ हा… हा!”
तिकडून काहीच प्रतीक्रिया नाही.
सिंहाने पुढच्या पंजाने तिची हनुवटी वर उचलली व म्हणाला,”आम्हाला रुसण्याचे कारण कळल्या शिवाय, आम्ही तुमचा रुसवा कसा काय काढणार बुवा?”
“राणी साहेब, प्रत्येक वेळेला,तुमचा रुसवा काढता ,काढता. बघा बरे, आपल्या छाव्यांची संख्या किती झाली आहे ते.”
सिंहीन गालात हसली व म्हणाली “आम्ही नाही जा….!”
ति हसल्याची बघून सिंहाला थोडा धिर आला व तो जागेवरच बसून थोडा पुढे सरकला आणी म्हणाला, “या जंगलच्या तुम्ही राणी साहेब अहात ,आम्हाला तुमचे रुसण्याचे कारण कळले ,तर हा, या जंगलचा राजा, तुम्हाला हवे ते आणून, तुमच्या पायाशी टाकेन.”
“सांगा….!, तुम्हाला कोणत्या प्राण्याचे मास पाहीजे ते.”
तिने डोळे वर करुन सिंहा कडे पाहीले व म्हणाली ,”मला कुठल्याही प्राण्याचे मास नको.”
“मग काय हवय ?”
“मला ती वस्तू पाहिजे, जी आपण परवा जंगलाच्या बाहेर चुकून गेलो होतो,तेव्हा तिथल्या दोन पायाच्या प्राण्यांच्या हाता मधे होती.ती वस्तू. ”
जंगलचा राजा विचारात पडला .
सिंह म्हणाला, “राणी सरकार, आम्ही नाही समजलो”.
सिंहीन आता निट उठून बसली व सिंहाच्या पंजावर पुढचा पंजा टाकत बोलली, “ती नाही का? जंगला बाहेरचे दोन पायाच्या प्रण्यांच्या हातामधे होती. आणी ते सर्व प्राणी त्या मधे डोळे टाकून बसलेले होते.व हाताच्या बोटाने काही तरी करत होते.त्यातील काही प्राणी ती वस्तू कानाला लावून बसलेले होते. ती वस्तू.”
सिंहाच्या लक्षात आले राणी साहेबांना काय पाहिजे ते.
सिंह ताटकन जागेवरुन उठला व बोलला, “राणी साहेब ति वस्तू सोडून तुम्ही कोणतीही वस्तू सांगा.मी माझा जिव धोक्यात टाकून तुम्हाला आणून देतो .पण, त्या वस्तूचे नाव काढू नका.”
“पण का, मला तर तीच वस्तू पाहीजे.
पाहीलत ते सगळे प्राणी किती किती खुष दिसत होते. प्रत्येक जण आपल्यातच दंग होता. आपल्या आजूबाजूला काय होतय ,आपल्या जवळ कोण बसलय हे सुध्दा त्यांच्या लक्षात येत नव्हते. आपण चुकून त्याच्या जवळ जावून आलो .तरी त्यांच्या लक्षात आले नाही. ”
“हा…!,त्याच्या मुळेच ति वस्तू आपल्याला नकोय.”
“पाहिलत तुम्ही….!”
“आपण चूकून त्यांच्या वस्ती स्थाना कडे गेलो होतो.पण ते सर्व प्राणी ,आपले काम सोडून त्या वस्तू मधे तल्लीन झाले होते. कोणाचेही कोणाकडे लक्ष नव्हते. मी बऱ्याच वेळा तिकडून जात असतो. पण ,जेव्हा केव्हा पहातो तेव्हा हे प्राणी त्या वस्तूशी खेळत असतात. आपल्या पिल्लांशी खेळायचे ,बोलायचे सोडून ते त्या वस्तू मधे खेळत बसतात. एक मेंका शेजारी बसतात पण कोणी कोणाशी बोलत नाही. ती वस्तू चांगली आहे पण तिचा अती वापर करत असल्याने त्या प्राण्यांचे एकमेकांशी बोलणे कमी होत चालले आहे.”
“आपण कसे एकमेकांशी बोलतो गप्पा मारतो. आपल्या छाव्यांशी खेळतो त्यांना वेळ देतो. हे ती वस्तू आणल्यावर कमी होईल.”
“हो का ? अशी आहे ती वस्तू”
तिच्या जवळ खाली बसत सिंह म्हणाला, “हो राणी साहेब”
“मग, नको गं बाई मला, असली वस्तू ,ज्या मुळे आपण सगळे एकमेकां पासून दुर होत जावू “.
असे म्हणून सिंहनीने सिंहाच्या छातीवर डोके ठेवून छानशी लोळण घेतली. तिच्या छाव्यांना प्रेमाने जवळ घेवुन “माझे छानुले, कित्ती गोड, गोड पिल्ले,” म्हणत त्यांना प्रेमाने चाटले ,आणी त्यां छाव्यांना थोडा वेळ बाहेर खेळायला पाठवून दिले.

डॉ. जतिन काजळे,
जामखेड. जि अहमदनगर.

पत्ता :-
डॉ.जतिनबोस काजळे,
श्रध्दा क्लिनीक,तपनेश्वर रोड,
मु/पो/ता.जामखेड जि.अहमदनगर
पिन.नं. 413201

फोन.9226227169

प्रतिक्रिया व्यक्त करा