You are currently viewing तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत माणगाव हायस्कूलचे वर्चस्व..

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत माणगाव हायस्कूलचे वर्चस्व..

संस्था अध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

कुडाळ

कोरोनानंतर तब्बल तीन वर्षानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय फुटबॉल स्पर्धेला आज प्रारंभ झाला. कोरोनामुळे तीन वर्ष फुटबॉल स्पर्धा आणि शालेय स्पर्धा बंद होत्या. आज या स्पर्धेचे उद्घाटन माणगाव कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या मैदानावर प्राचार्य प्रशांत धोंड यांच्या हस्ते झाले. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर फुटबॉल स्पर्धेत सुरुवात झाली आणि मैदान यानिमित्ताने गजबजुन गेले होते. तालुकास्तरीय कुडाळ तालुकास्तरीय स्पर्धेचे तिन्ही गटाचे विजेतेपद माणगाव स्कूलने पटकावले आहे. 14 वर्षे खालील वयोगटात साळगाव हायस्कूलचा एक शून्यने पराभूत करत माणगाव स्कूल ने विजेते पटकावले.. तर 17 वर्षे खालील मुलांच्या वयोगटात माणगाव हायस्कूलने डॉन बॉस्को हायस्कूलचा दोन शून्य ने पराभव करत विजेतेपद पटकावले. तर 19 वर्षे वयोगटात माणगाव हायस्कूलने साळगाव हायस्कूलचा एक शून्यने पराभव करत विजेतेपद पटकावले. सर्व सामाने अत्यंत रोमांचकारक झाले. आता जिल्हास्तरासाठी विजेते संघ पात्र ठरले आहेत.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अमोल दळवी,वैभव कोंडसकर, कृष्णा सावंत, आर.एम.कदम,नंदू पिळणकर,संजय पिळणकर,विश्वास धुरी यांनी काम पाहिले.साईड पंच म्हणून लवू सावंत यांनी काम पाहिले. माणगाव संघाचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड,उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण,सीईओ वि.न आकेरकर व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + eight =