You are currently viewing कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रस्ताव नाही

कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रस्ताव नाही

सुधीर सावंत, संजय आग्रे यांची माहिती…

 

कणकवली :

कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवणुकीसाठी आम्ही ५ अर्ज दाखल केले आहेत. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढणार आहोत. भाजपासोबत लढण्याबद्दल चर्चा सुरू आहे. अद्यापही कोणताही प्रस्ताव नाही, आम्हाला प्रतिसाद आलेला नाही, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना नेते माजी खा.सुधीर सावंत, संजय आग्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आमच्या पक्षाची लवकरच जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांची शिवसेना आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.त्यामुळे मी जिल्हा दौरा करीत आहोत. आज ५ ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे ठरले आहेत. घोडगे, सोनवडे व अन्य गावांमध्ये आम्ही भेटी दिल्या. जिल्ह्यातील या निवडणुकीत बदल घडविण्यासाठी हा दौरा आहे. मालवण, कणकवली, वैभववाडी या ठिकाणी मी फिरत आहे .२१ नोव्हेंबर पर्यंत मी दौरा करत आहे. बाळासाहेबांची शिवसेना ग्रामपंचायत निवडणुका लढण्यासाठी आघाडीवर असेल. लोकांनी आम्हाला असे सांगितले तर आम्ही गाव पॅनल करणार तिथे आम्ही लढत करणार नाही असे माजी खा.सुधीर सावंत, संजय आग्रे यांनी सांगितले.

या निवडणुकीत जाहीरनामा हा आज फायनल करून उद्या जाहीर करणार आहोत. गाव समृध्द होत नाही तोपर्यंत देश समृध्द होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ध्येय आहे, की आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनविणयासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्ही भाजप सोबत लढण्या बाबत दीपक केसरकर उद्या भाजपशी चर्चा करणार आहेत. चर्चा कोणासोबत करायची हे पालकमंत्री ठरवतील, असे सुधीर सावंत यांनी सांगितले .

यावेळी संदेश पटेल, एम.एम.सावंत, भास्कर राणे, शेखर राणे, दामोदर सावंत, वर्षा कुडाळकर, भूषण परुळेकर, सुनिल पारकर, बाळू पारकर, बाबू आचरेकर, बाबू राणे, दिलीप घाडीगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा