You are currently viewing नववर्ष आरंभानं

नववर्ष आरंभानं

*ज्येष्ठ कवयित्री निसर्गसखी मंगला रोकडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*💐नववर्ष आरंभानं💐*

 

जोति शिवबा बाबांच्या

जन्म उत्सवाची शान

करु स्वागत तयांचे

नववर्ष आरंभानं॥धृ॥

नको गुढ्या उभवा रे

मानवतेचे निशान

खरे स्वागत ह्यातच

खरोखरी हा सन्मान॥१॥

करु म्हणतो स्वागत

चैत्र नव्या चैतन्यानं

नव्या बहाराने केलं

सुरु चित्र चितारण॥२॥

करा संकल्प ही नवा

अंधश्रध्दा झुगारुन

चला स्विकारु विज्ञान

दूर अज्ञान सारुन॥३॥

महा मानवांचा असा

व्हावा मान नि सन्मान

नव्या मराठी वर्षाच्या

स्वागताच्या आरंभान॥४॥

 

*–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे*

*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.

दूरध्वनी क्रमांक ९३७१९०२३०३

💐💐💐💐💐💐🌹🌹🌹💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा