You are currently viewing सागर सुरक्षा कवच मोहिमेत ‘रेड टिम’ला पकडण्यात ‘ब्ल्यु टीम’ला यश

सागर सुरक्षा कवच मोहिमेत ‘रेड टिम’ला पकडण्यात ‘ब्ल्यु टीम’ला यश

मालवण

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून जिल्ह्याच्या किनारपट्टीवर राबवल्या गेलेल्या सागरी सुरक्षा कवच मोहिमेची आज सांगता झाली. या मोहिमेत पोलिसांच्या ब्ल्यू टीमचा बंदोबस्त भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेड टीमचा हा प्रयत्न ब्ल्यू टीमने हाणून पाडत रेड टीमला पकडण्याची मोहीम फत्ते केली.

सागरी सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ‘सागर कवच’ मोहिमेस कालपासून प्रारंभ झाला होता. यात पोलिसांच्या ब्ल्यू टीम ने किनारपट्टीवर बंदोबस्त ठेवला होता. तर पोलिसांचीच रेड टीम हा बंदोबस्त भेदण्याचा प्रयत्न करत होती. या मोहिमेअंतर्गत मालवण बंदारात उतरून कुणकेश्वर आणि देवगडच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘रेड टिम’चा प्रयत्न ‘ब्ल्यु टीम’ने हाणून पाडला. बुधवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास मालवण बंदरासमोर रेड टिम त्यांच्या ताब्यातील ‘शीतल’ गस्ती नौकेचे सर्व दिवे बंद करून काळोखाचा फायदा घेत मालवण बंदरात घुसण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र सदर ट्रॉलरच्या अर्थात गस्ती नौकेच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर समुद्रात गस्त घालणाऱ्या ‘अस्मिता’ या स्पीड बोटमधील पथकाने त्यांना पकडण्याची मोहीम फत्ते केल्याने या मोहिमेची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + eight =