रियाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला….

रियाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला….

मुंबई प्रतिनिधी
मुंबई सुशांत राजपूत आत्महत्याप्रकरणी सुशांतची प्रेयसी रिया हिला ड्रग्स प्रकरणी एनसीबी ने अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने १४ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर रिया हिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले .
तिला आणि शौविकला जामीन मिळावा यासाठी कायदेशीर प्रयत्नही करण्यात आले परंतु रियाने दुसऱ्यांदा तिच्या जामिनासाठी अर्ज केला होता. ज्याचा निर्णय आज होणार होता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या जामिनाच्या अर्जात रियाने म्हटले आहे की तिने एनसीबीच्या दबावाखाली ड्रग रॅकेटशी आपले संबंध असल्याची गोष्ट कबूल केली होती. तिचा दावा आहे की ती सुशांतच्या सांगण्यावरून तिचा भाऊ शौविकला ड्रग्स खरेदी करायला सांगायची आणि त्याच्याजवळ किंवा घरातून ड्रग्स मिळालेले नाहीत सत्र न्यायालयात रियाच्या वकिलांनी गुरुवारी जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात रियाने आपल्या बचावात म्हटले आहे की तिने एनसीबीच्या दबावामुळे ड्रग तस्करीचा आरोप मान्य केला आहे. पण तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग मिळालेले नाही.
पण दोन्ही वेळा मुंबई न्यायालयाने तिचा जामिन अर्ज फेटाळून लावत तिला तुरुंगात राहण्याचा निर्णय सुनावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा