You are currently viewing नेमळे येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर टायर फुटल्याने इनोव्हा कारला अपघात

नेमळे येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर टायर फुटल्याने इनोव्हा कारला अपघात

आजगावातील दोघे किरकोळ जखमी

सावंतवाडी

इनोव्हाचा टायर फुटल्याने झालेल्या अपघतात आजगाव येथील दोघे सुदैवाने किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे घडला. बाबल गावडे व विठ्ठल केदार अशी त्या दोघांची नावे आहेत. दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. गावडे व श्री. केदार हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कारने ओरोस येथे जात होते. झाराप पत्रादेवी बायपासवरून जात असताना नेमळे येथील नवीन स्वामी समर्थ मठाजवळ गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. सुदैवाने या अपघातात दोघांनाही मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर मळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी व संजय जोशी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींची विचारपूस केली. यानंतर त्या ठिकाणी अन्य ग्रामस्थ उपस्थित झाले व त्यांनी जखमींना उपचारासाठी कुडाळ येथे हलविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =