You are currently viewing पु.ल.”नावाचं गारुड

पु.ल.”नावाचं गारुड

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि.देशपांडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*सर्वांचे प्रिय-” पु. ल.”देशपांडे -“भाई”ना जयंती -निमिताने अभिवादन*
———————————————-
*पु.ल.”नावाचं गारुड*
—————————————
पु.ल.” नावाचं आहे हो गारुड
आयुष्य जगणे सुसह्य केले
आपल्यासाठीचे जणू हे
संमोहक शब्दभारुड झाले ।।

वलयांकित या व्यक्तिमत्वात
होते माणुसकी हे बीजतत्व
मराठी माणसाला दिले तुम्ही
निरागस विनोदाचे खरे तत्व ।।

पु.ल.” तुम्ही एक छान केले
रुक्ष जीवनात हास्य फुलविले
तुझे आहे तुजपाशी “,कसे ?
आम्हा अजाणांना समजाविले ।।

संग्रही असते व्यक्ती आणि वल्ली
मनमुराद हसा,तुमची गुरुकिल्ली
पु.ल.”संचारले अक्षर नंदनवनात
दैवत लाडके झाले रसिक मनात ।।
———————————————–
कविता- पु. ल.” नावाचं गारुड
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
————————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा