You are currently viewing दयानंद मांगले यांना उत्कृष्ठ समाजपयोगी जिल्हा एक्सलन्स अवार्ड प्राप्त

दयानंद मांगले यांना उत्कृष्ठ समाजपयोगी जिल्हा एक्सलन्स अवार्ड प्राप्त

भारतीय जैन संघटनेने केले सन्मानित

देवगड

भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्कृष्ठ समाजपयोगी कार्य करणाऱ्या बिजेएस पदाधिकारी कार्यकर्ते सलग्न राज्य विभागीय,जिल्हा एक्सलन्स अवॉर्ड २०२२ सन्मान अभिनंदन पत्र कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले याना प्राप्त झाला असून नाशिक येथील नुकत्याच पार पडलेल्या राज्य जिल्हा,शहर ,पदाधिकारी राज्यस्तरीय विशेष सभेत बिजेएस एक्सलन्स अवार्ड २०२२ वितरण सोहळा रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे आहे.

भारतीय जैन संघटना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड (इरोड तामिळनाडू) यांच्या हस्ते राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब (जालना )राज्य प्रभारी नंदकुमार साखला (नाशिक)राज्य उपाध्यक्ष दीपक चोपडा,व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीतत्यांना प्रदान करण्यात आला.

या विशेष सभेत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड यांनी बिजेएस कल,आज,और कल या वर मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे नाशिक रोड,नाशिक शहर,नवीन नाशिक येथील नवनिर्वाचित भारतीय जैन संघटना पदाधिकारी पद्ग्रहण सोहळा, सोहळा पार पडला.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शक नेतृवाखाली भारतीय जैन संघटना विविध समाजपयोगी उपक्रम देश पातळीवर राबवित आहे.या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन दयानंद मांगले यांनी गेली तीन वर्षांहुन अधिक काळ विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना कोकण विभागातून बिजेएस अवॉर्ड २०२२ देऊन गौरविण्यात आले.दयानंद मांगले हे कोकण दिगंबर जैन समाज संस्था महाराष्ट्र चे कोकण विभागीय अध्यक्ष आहेत.त्यांच्या या गौरवाबद्दल दिगंबर जैन कासार समाज संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ,पोपटलाल डोर्ले,कोकण विभागीय अध्यक्ष बाबूलालजी जैन सिंधुदुर्ग जैन परिवार अध्यक्ष ,डॉ.दीपक तुपकर,जैन समाज सेवा मंडळ अध्यक्ष खारेपाटण अध्यक्ष विलास डोर्ले ,रायगड दिगंबर कासार समाज संस्था अध्यक्ष हेमंत भोकरे,श्याम भोकरे ,कमलाकर मांगले,रत्नागिरी अध्यक्ष अजित मोहिरे,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुनील त्रिभुवणे,तसेच अन्य पदाधिकारी व समाज बांधव तसेच सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 12 =