You are currently viewing आचऱ्यातील डॉ. विशाल परब यांचे निधन…

आचऱ्यातील डॉ. विशाल परब यांचे निधन…

मालवण

आचरा व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ व्यापारी, गजानन मेडिकल स्टोअरचे मालक विनायक परब यांचा मुलगा डॉ. विशाल विनायक परब (वय-३५) यांचे अल्पशा आजाराने काल रात्री येथे निधन झाले.
डॉ. विशाल हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण आचरा गावी झाले होते. मुंबई येथे ते वैद्यकीय सेवा देत होते. आजारपणामुळे काही दिवसापूर्वीच ते आचरा येथे घरी आले होते. त्यांच्या अकाली निधनाने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आचरा गावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आचरा व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार वैभव नाईक यांनीही परब कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, वडील, आई भाऊ, काका असा परिवार आहे. सकाळी त्यांच्या मूळ गावी चुनवरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 13 =