You are currently viewing कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा : भाजपची मागणी, अधिकाऱ्यांना घेराव

कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा : भाजपची मागणी, अधिकाऱ्यांना घेराव

कुडाळ

कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकारीपदी नियुक्त असलेल्या सौ छाया परब या शहरातील सर्वसामान्य ग्राहकांशी गैरवर्तणूक करीत असून वीज वसुली करण्यासाठी अरेरावीची भाषा वापरत आहेत, त्यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नेते माजी जि प अध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी कुडाळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला.

छाया परब यांच्या वर्तणुकीबाबत भारतीय जनता पार्टीकडे कुडाळ शहरातील ग्राहक आणि ग्रामस्थ यांच्या तक्रारी असून सदर महिला वसुली अधिकारी यांची तात्काळ बदली करावी.अन्यथा ग्राहकांच्या आणि ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा स्वरूपाचे निवेदन महावितरण कार्यकारी अभियंता कुडाळ यांना कुडाळ भाजपच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी घेराव घालत सादर केले.

यावेळी भाजपचे नेते अशोक सावंत, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री.सचिन तेंडुलकर, तालुका अध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी सभापती जि. प प्रिंतेश गुरव, सरचिटणीस देवेंद्र सामंत, नगरसेवक निलेश परब,अविनाश पराडकर, राजवीर पाटील,नंदू राणे,सौ मुक्ती परब,सुश्मित बांबूळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 5 =