मोफत वेबिनार – ‘शारीरिक विकलांगता आम्ल (ॲसिड) हल्ल्याने बाधित व्यक्ती’ याबाबत…

मोफत वेबिनार – ‘शारीरिक विकलांगता आम्ल (ॲसिड) हल्ल्याने बाधित व्यक्ती’ याबाबत…

 

मुंबई :

 

दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत विविध वेबिनार आयोजित करण्यात आली आहेत. याअंतर्गत सोमवार, दि. 19 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता शारीरिक विकलांगता आम्ल (ॲसिड) हल्ल्याने बाधित व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता डॉ.अमेय बिंदू यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/cRe_GJmHYnk या लिंकचा वापर करावा. तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या यु ट्यूब चॅनलला भेट द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा