You are currently viewing कणकवली- गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

कणकवली- गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश

कणकवली :

कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश अनंत बोभाटे यांच्यासह सदस्य सुनीता अनाजी सावंत, मंजुषा महादेव बोभाटे, प्रसन्ना प्रशांत सावंत व शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री इतर उपस्थित होते. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत गावात कोणतेही विकास काम न झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच मंगेश बोभाटे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =