You are currently viewing टायर फुटून करूळ घाटात ट्रकचा अपघात : दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला….

टायर फुटून करूळ घाटात ट्रकचा अपघात : दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला….

ट्रकमधील सिमेंट पत्रे दरीत; ट्रकचे मोठे नुकसान.

वैभववाडी
सिमेंट पत्र्याने भरलेल्या ट्रकला करूळ घाटात अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. दरीकडील बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर ट्रकमधील पत्रे दरीत कोसळले आहेत. या अपघातात ट्रक चालकाचा दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला आहे. मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना वैभववाडी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. होते घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली आहे.
सिमेंटचे पत्रे घेऊन ट्रक पुणेहुन तरेळेकडे जात होता. करूळ घाटात धोक्याच्या खिंडी नजीक ट्रक आला असता ट्रकचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला. व ट्रक दरीकडे असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर सर्व पत्रे दरीत कोसळले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल श्री. पडवळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकमधील जखमींना त्यांनी करूळ चे ग्रामस्थ संदीप मोरे, भूषण पडवळ यांच्या मदतीने बाहेर काढत उपचारासाठी हलविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 2 =