You are currently viewing नेमळे येथे धुमबाईकस्वाराचा अपघात, पायाला गंभीर दुखापत…

नेमळे येथे धुमबाईकस्वाराचा अपघात, पायाला गंभीर दुखापत…

नेमळे येथे धुमबाईकस्वाराचा अपघात, पायाला गंभीर दुखापत…

सावंतवाडी

दुचाकी डिव्हाडरला आदळल्याने नेमळे येथे धुम बाईकस्वाराचा अपघात झाला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडला. त्याला अधिक उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. तो बाईकस्वार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी हा अपघात घडला. अचानक ब्रेक लागल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला. जखमी अवस्थेत त्याला तेथील ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + twelve =