You are currently viewing पंजाबरावांना आगळीवेगळी आदरांजली: अमरावतीची राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी

पंजाबरावांना आगळीवेगळी आदरांजली: अमरावतीची राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी

*पंजाबरावांना आगळीवेगळी आदरांजली: अमरावतीची राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी*

तुम्ही अमरावतीच्या मोर्शी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय चौकापासून तर अमरावतीच्या नागपूर सीमेवर असलेल्या वेलकम पॉइंट पर्यंत नजर जरी मारली तर तुम्हाला लक्षात येईल रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर चित्रकला महाविद्यालय जनता कृषी महाविद्यालय श्री शिवाजी कृषी महाविद्यालय हा परिसर पूर्ण टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलरने व्यापून गेला आहे. निमित्त आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेने तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे . डॉ पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने दृष्टी असलेले पुरुष होते आणि त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 यावर्षी स्थापना करून समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून श्री शिवाजी शिक्षण संस्थेने खऱ्या अर्थाने समाजासमोर एक मूर्तीमंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवले आहे .या कृषी प्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कृषी प्रदर्शनी सत्तर एकरांमध्ये विखुरलेली आहे .शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी एकत्र करून आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून या संयोजकांनी या प्रदर्शनीमध्ये जिवंतपणा आणलेला आहे. म्हणजे तुम्हाला तिथं नकली झाडं पाहायला मिळणार नाहीत .प्रत्यक्ष शेतामध्ये झाड लावलेली आहेत. गोबी लावलेली आहे .फळ फळावळ लावलेले आहेत. तसेच ज्या ज्या गोष्टी आपल्या शेतीशी निगडित आहेत त्याची पेरणी करून व संवर्धन करून त्यांनी याच प्रदर्शनीमध्ये जिवंतपणा आलेला आहे आणि तो फारच महत्त्वाचा आहे. अनेक वेळा प्रदर्शनीमध्ये इकडचे तिकडची झाडे उसने,पासनी किंवा भाड्याने आणली जातात. पण येथे तसे नाही आहे.सर्व पिकं शेतजमिनीवर पेरलेली आहेत आणि ती तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत .तुम्ही प्रदर्शनीत प्रवेश केल्याबरोबर तुमची नोंदणी केली जाते आणि मग तुमचा प्रदर्शनीचा प्रवास सुरू होतो .सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी इथे प्रदर्शनीमध्ये फिरण्यासाठी जाण्या येण्यासाठी इ रिक्षाची सोय केलेली आहे . मी जेव्हा या प्रदर्शनीमध्ये फिरलो तेव्हा मला या प्रदर्शनीची भव्यता लक्षात आली .खरं म्हणजे प्रत्येक अमरावतीकर नागरिकानेच नव्हे तर अमरावती व इतरही जिल्ह्यातील प्रत्येकांनी ही प्रदर्शनी पहावी एवढेच नाही तर शाळांनी आपल्या सहली आयोजित कराव्यात एवढी ही प्रदर्शनी देखणी आहे. आजकालच्या इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना झाडं कशी असतात झाडाला फळ कशी लागतात झाडाला फुले कशी लागतात कोणते झाड कशाचे आहे याचे ज्ञान असेलच असे नाही .ती झाडे ती फुले ते पाने ती फळे फक्त आणि फक्त पुस्तकातच दिसतात .पण ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने आलेला आहे आणि तो महत्त्वपूर्ण आहे. मला वाटते श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ही आगळे वेगळी राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करून खऱ्या अर्थाने पंजाबरावांना आदरांजली अर्पण केलेली आहे .आजकालच्या यंत्र युगामध्ये कलियुगामध्ये प्रत्येकाने आपला परिवार वाटून घेतलेला आहे .मी माझी बायको माझी मुलं यांच्या बाहेर पाहायला त्याला वेळ नाही .परंतु संयोजकांनी आपली कल्पकता वापरून कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने अमरावतीकरांना नव्हे अमरावती जिल्ह्यातील लोकांना एक भव्य दिव्य दालन उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही कोणत्याही दालनात गेलात तर तुम्हाला त्या दालनामध्ये त्या दालनातील शेतीच्या संदर्भातील सर्वोच्च वस्तू फुले फळे झाडे पाहायला मिळतील .याशिवाय जागोजागी मदत केंद्र माहिती केंद्र उभारून या कृषी प्रदर्शनीने कृषी प्रदर्शनी पाहणे सोयीचे करून ठेवलेले आहे .त्याबरोबरच भव्य सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच कृषी विषयक माहिती देणारे उपक्रम व सुसंवाद. श्री शिवाजी संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री महादेवराव भुईवार यांचे कीर्तन .शेती विषयक माहिती. असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवलेले आहेत. प्रदर्शनीची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ जरी असली तरी मला असं वाटते की ही भव्य प्रदर्शनी लक्षात घेता श्री शिवाजी संस्थेने ही प्रदर्शनी दोन-तीन दिवस अजून सुरू ठेवावी .30 तारखेला ही प्रदर्शनी संपणार आहे .पण ही प्रदर्शनी किमान दोन-तीन दिवस तरी अजून सुरू ठेवावी म्हणजे इतरांनाही या प्रदर्शनीचा लाभ घेता येईल तसेच अमरावती शहरातील शाळांनाही विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी दाखवावी .असा योग वारंवार येत नसतो .योगायोगाने पंजाबरावांच्या 125 व्या जयंतीनिमित्त हा योग आलेला आहे .आपण दुसऱ्या राज्यात जाऊ की नाही .दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ की नाही .हा एक प्रश्नचिन्ह आहे ? पण आपल्या गावात गंगा आली रे अंगणी अशी परिस्थिती असताना या परिस्थितीचा लाभ आपण घेतला पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते .मी जवळपास भारतातील 23 राज्याचा दौरा केलेला आहे .वेगवेगळे प्रदर्शने पाहिलेले आहेत .पण इतके भव्य दिव्य प्रदर्शन मी माझ्या 71 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रथमच पाहत आहे. याशिवाय या प्रदर्शनामध्ये ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले ते देखील उल्लेखनीय आहे .चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे शूटिंग पाहायला मी सहपरिवार मुंबईला गेलो तर मला जवळपास जाण्या येण्याचा राहण्याचा 50 हजार रुपये खर्च आला. तोच भारत गणेशपुरे अमरावतीचा सुपुत्र चला हवा येऊ द्या या निमित्ताने अमरावतीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपला शो घेऊन आला. तो देखील लोकांना विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर सुप्रसिद्ध व-हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांना देखील निमंत्रित करून संस्थेने आपले व-हाडीपण जपलेले आहे .हे कृषी प्रदर्शन खरोखरच मनापासून हृदयापासून पाहण्यासारखे आहे आणि तुम्ही जर ते पाहिले तर दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहणार आहे. पंजाबरावांनी आपले संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खर्ची घातलेले आहे .आपण आपल्या जीवनातील फक्त दोन-तीन तास या कृषी प्रदर्शनासाठी द्यावयाचे आहेत आणि तुम्ही जर हे प्रदर्शन पाहिले तर खरोखरच त्याची भव्यता दिव्यता तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकून राहील व तुम्हाला प्रेरणा देत राहील. तसेच तुमच्या मुलांना विद्यार्थ्यांना देखील हे प्रदर्शन प्रेरणा देऊन जाईल या शंका नाही. तर चला निघू या अमरावती मोर्शी रोडवरील जनता कृषी विद्यालयाच्या समोरील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला.
प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती कॅम्प 9890967003

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 14 =