You are currently viewing सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश प्रदान…

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश प्रदान…

सावंतवाडी

मुंबई येथील कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांना, दिव्यांग व्यक्तींना तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच व दहा हजार रुपयांचे धनादेश आज सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सोनू कदम कुंब्रल, दिलीप माडखोलकर – माडखोल
प्रणाली गावडे- माडखोल, रमेश धुरी- शेर्ले, दर्शना राऊळ- शेर्ले, रोहीत परब- शेर्ले, केशव जाधव-आंबोली, विष्णू जाधव – कवठणी अशी लाभार्थ्यांची नावे असून सध्याच्या कोरोना काळातील बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त व्यक्तींना अशा आर्थिक मदतीने तात्पुरता का असेना पण थोडा दिलासा मिळण्यास मदत झालेली आहे. लाभार्थ्यी व्यक्तींनी व त्यांच्या नातेवाईकांनी सामंत ट्रस्ट व डॉ जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले.
वरील आठ लाभार्थ्यां व्यतिरिक्त आणखी नऊ व्यक्तींचे धनादेश देखील आलेले आहेत पण सध्याच्या कोरोना काळात त्या व्यक्तींचे फोन सेवेत नसल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. नजिकच्या काळात त्यांच्या गावात जाऊन संपर्क करून त्यांना धनादेश प्रदान करण्यात येतील असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 9 =