You are currently viewing कणकवली नगर वाचनालयातर्फे २० रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

कणकवली नगर वाचनालयातर्फे २० रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वाचक स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झालेला असून तालुकास्तरीय वाचक स्पर्धा कणकवली नगरवाचनालयातर्फे रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेली आहे.

स्पर्धक कणकवली तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा वाचक सदस्य असणे आवश्यक आहे. ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती’ असा या वाचक स्पर्धेचा विषय असून दहा मिनिटांच्या कालावधीत या विषयाचे विवेचन स्पर्धकाने लिखित टिपणीचा आधार न घेता सादर करावयाचे आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या तीन स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी प्राप्त होते..

इच्छुक स्पर्धकाने १० नोव्हेंबर २०२२ पूर्वी ग्रंथापालाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर वाचनालयातर्फे करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seventeen =