You are currently viewing इंडियन एक्स सर्विसेस लीग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार

इंडियन एक्स सर्विसेस लीग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार

इंडियन एक्स सर्विसेस लीग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार

इंडियन एक्स सर्विसेस लीग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर, भारतीय थलसेना, (ईएमई कोर) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन जाहीर सत्कार सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग, शाखा कोलगाव येथे सु.मेजर – शिवराम जोशी, अध्यक्ष सैनिक नागरी पतसंस्था व सुबेदार- शशिकांत गावडे, अध्यक्ष, आय. ई.एस.एल यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास खालील माजी सैनिक उपस्थित होते.

1) सु.मेजर- शिवराम गणेश जोशी, चेअरमन सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग
2) सुभेदार – शशिकांत गावडे, अध्यक्ष, इंडियन एक्स सर्विसेस लीग, सिंधुदुर्ग.
3) कॅप्टन- कृष्णा परब उपाध्यक्ष, आय.ई.एस.एल
4) नायक- बाबुराव कविटकर कोषाध्यक्ष,आय.ई.एस.एल
5) हवालदार- दीपक राऊळ, जन.सेक्रेटरी, आय.ई.एस.एल
6) एस/एम.- चंद्रशेखर जोशी, समन्वयक, माजी सैनिक संघटना
7) कॅप्टन विक्टर पिंटो, कुडाळ तालुकाअध्यक्ष, आय.ई.एस.एल
8) सु‌बेदार – शिवराज पवार, व्यवस्थापक सैनिक स्कूल आंबोली,
9) सुनील राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सैनिक ना.स.पतसंस्था, सिंधुदुर्ग
10) दीपक राऊळ कार्यालय प्रमुख आय.ई.एस.एल.
11) निवेदिका – सौ.हेमांगी चंद्रशेखर जोशी, रिसोर्स पर्सन
12) सुभेदार- सुभाष कदम, आय.ई.एस.एल
13) प्रल्हाद तावडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
14) सुहास सावंत, शाखा व्यवस्थापक कुडाळ
15) सौ.संगीता सावंत, शाखा व्यवस्थापक, कोलगाव
तसेच अनेक माजी सैनिक व सैनिक नागरी पतसंस्था कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सौ. हेमांगी चंद्रशेखर जोशी यांनी केले तर आभार कॅप्टन कृष्णा परब यांनी मानले. सु.मेजर शिवराम जोशी, सुबेदार शशिकांत गावडे, कॅप्टन व्हिक्टर पिंटो यांनी लेफ्टनंट दिपाली गावकर चे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपण कसे घडलो व सैन्यात भरती होण्यासाठी शर्थीचे कसे प्रयत्न केले हे विशद केले. ह्या बाबतीत आई-वडील आणि भाऊ भूषणचे मोलाचे योगदान आहे असे सांगितले. सैनिकांनी केलेल्या ह्या सत्कार सोहळ्यामुळे आपण भारावून गेले आहे हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे मी आयुष्यात कधीच हा सत्कार विसरु शकणार नाही तसेच जिल्हावासियांनी माझे केलेले अद्वितीय स्वागत आणि सत्कार समारंभ हे आपणास अनपेक्षितच होते असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =