You are currently viewing आंबा बागायतदारांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरू करा – अशोक हांडे

आंबा बागायतदारांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरू करा – अशोक हांडे

आंबा बागायतदारांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरू करा –
अशोक हांडे

बागायतदारांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी…

देवगड

वाशी मार्केट मध्ये आंबा नेण्यासाठी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कशेडी घाटातील बोगदा सुरू करण्यात यावा, अशी मागणी वाशी मार्केट मधील आंबा व्यापारी व मराठी बाणा या कार्यक्रमाचे प्रमुख अशोक हांडे यांनी केली आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यास आंबा बागायतदारांचे पैसे आणि वेळ वाचणार आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा