You are currently viewing भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुरेश चौकेकर यांची निवड

भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुरेश चौकेकर यांची निवड

भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक संदर्भात भाजपा ची संघटनात्मक बांधणी

आगामी कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी माध्यमिक शिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झालेले व विविध संस्थांवर काम केलेले शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते सुरेश ज्ञानदेव चौकेकर यांची निवड करण्यात आली .
त्यांनी सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व वराड कनिष्ठ महाविद्यालय येथे माध्यमिक शिक्षक म्हणून 35 वर्ष सेवा केली . तसेच माध्यमिक शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली 32वर्ष संघटनेत कार्यरत व नेतृत्वही केले. त्यांनी मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द केली . ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे स्वीकृत सदस्य ही होते .त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक लि.चे संचालक म्हणून काम केले .मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण चे व्हाईस चेअरमन होते . तसेच वैभवलक्ष्मी बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. चौके चे चेअरमन म्हणून काम पाहिले . मालवण तालुका माध्य. शाळा सेवक सहकारी पतसंस्था लि. कट्टा चे चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सह. पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग चे संचालक तसेच कुलस्वामिनी सह. गृहनिर्माण संस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी चे चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारली .
अश्या प्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांवर काम केलेले व शिक्षक चळवळीतील अनुभवी व्यक्तीमत्व सुरेश चौकेकर यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळ मधील महालक्ष्मी हाॅल मध्ये संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये चौकेकर सरांची निवड जाहीर होताच सर्वांनी टाळांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले .
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , प्रदेश चिटणीस निलेशजी राणे , आमदार नितेशजी राणे , माजी आम.अजीतराव गोगटे , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , महीला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरे , जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई व अशोक सावंत , प्रवक्ते संजु परब , जेष्ठ नेते राजू राऊळ व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा