You are currently viewing अयोध्यातून आलेल्या रामराज्य रथयात्रेचे बांद्यात जल्लोषी स्वागत…

अयोध्यातून आलेल्या रामराज्य रथयात्रेचे बांद्यात जल्लोषी स्वागत…

बांदा

अयोध्या येथून सुरू झालेली श्री रामराज्य रथयात्रा आज सकाळी बांदा शहरात दाखल झाली. या रथयात्रेचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. त्यानंतर रथयात्रेने गोवा म्हापसा येथे प्रयाण केले.

अयोध्या येथून या रथ यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर विविध राज्यातील प्रवासानंतर ही यात्रा पुन्हा अयोध्येत पोचणार आहे. या यात्रेचे नेतृत्व श्री शक्ती शांतानंद महर्षी करीत आहेत. आज सकाळी कट्टा कॉर्नर येथील ओवेस कॉम्प्लेक्स येथे रथ यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. यावेळी प्रभू श्री रामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी श्री शक्ती शांतानंद महर्षी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी श्रीराम भक्तांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा धर्म प्रचार प्रमुख सुनील सावंत, प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, बजरंग दल कार्यकर्ते अमित बांदेकर, रोहन बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, संदीप बांदेकर, सिद्धेश पावसकर, शामकांत काणेकर, बाबा काणेकर, निलेश सावंत, स्वागत नाटेकर, आबा धारगळकर, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, रत्नाकर आगलावे, अवंती पंडित, रुपाली शिरसाट, उमांगी मयेकर, अक्षय मयेकर, संतोष परब, साहिल कल्याणकर, दीपक सावंत, निलेश देसाई, संजय चांदेकर, शेखर बांदेकर, सुनील नातू, अरुणा मोर्ये, अवंती पंडित, बाबल मोर्ये आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा