मोबाईल ग्राहकास दमदाटी? 

मोबाईल ग्राहकास दमदाटी? 

सावंतवाडी शहरातील प्रकार

सावंतवाडी : 

मोरडोंगरी येथील एका युवकाने सावंतवाडी येथील एका नामांकित मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल 25 सप्टेंबर 2020 रोजी घेतला होता. चार दिवसातच मोबाईल वापर करताना गरम होऊ लागला. याबाबत संबंधितान मोबाईल विक्रेत्याला विचारले असता त्यानी आपला काही संबंध नसल्याचे तसेच आपण कोणतीही मदत करू शकत नसल्याचे सांगत दमदाटी केल्याच त्या युवकाकडून सांगण्यात आल. आज त्या युवकान ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश अध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर संबंधित मोबाईल विक्रेत्याला यासंधर्भात विचारणी केली असता आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले. या संदर्भात सॅमसंग केअर सेंटरमध्ये अमित वेंगुर्लेकर यांनी मोबाईल संदर्भात योग्य त्या दुरुस्ती अहवालाची प्रत मागितली. तसेच संबंधित प्रकरणी शासकीय कार्यालयात तक्रार दाखल करून संबंधित मोबाईल फोन हा ओरिजनल कॉपी आहे की कॉपी प्रिंट आहे ? याबाबत ही दखल घेतली जाणार आहे तसेच अशा प्रकारच्या इतर ग्राहकांच्या तक्रारी आहेत का? यासंबंधी अधिक माहिती काढली जाणारअसल्याची माहिती अमित वेंगुर्लेकर यांनी दिलीय.

प्रतिक्रिया व्यक्त करा