You are currently viewing भाजपा साऺस्कॄतीक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार

भाजपा साऺस्कॄतीक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार

अक्षया चितळे , कोकण विभाग संयोजक सांस्कृतिक आघाडी

कोकण भुमी ही कलाकारांची खाण आहे . कोकणातील कलाकारांनी देशात नव्हे तर जगात अटकेपार झेंडा रोवला आहे . कोकणचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी भाजपा साऺस्कॄतीक आघाडीच्या वतीने सांस्कृतीक चळवळ उभी करणार असल्याचे कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजीका अक्षया चितळे नी सांगितले .


दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली , त्यावेळी भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला . यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सांस्कृतिक आघाडीच्या मुग्धा भट – सामंत ह्या उपस्थित होत्या . यावेळी सांस्कृतिक आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक बाळ पुराणीक , जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके यांनी सिंधुदुर्गातील सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली . तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला असलेली *दशावतार*, व ही कला जिवंत ठेवलेली दशावतार मंडळे यांना राज्य सरकार कडून भरीव मदत मिळाली पाहिजे , अशी आग्रही मागणी केली . तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी भाजपा साऺस्कॄतीक आघाडीने पुढाकार घ्यावा , अशी मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुणगट्टीवार यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया चितळे यांनी सांगितले .

यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत ताऺडेल , महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक नागेश गावडे , नगरसेवीका साक्षी पेडणेकर – कृपा मोंडकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व दिपक नाईक , सांस्कृतिक आघाडी ता.अध्यक्ष शैलेश जामदार , शक्ती केंद्र प्रमुख नितीन चव्हाण , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , खानोली सरपंच प्रणाली खानोलकर , रंगकर्मी रमेश नार्वेकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ गडेकर व पींटु सावंत , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर , वारकरी संप्रदायाचे दिवाकर कुर्ले , आनंद उर्फ बीट्टु गावडे , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर – नितीश कुडतरकर , प्रथमेश सावंत , विश्वनाथ परब , गोविंद परब इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =