You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन मंजूर झालेल्या माणगांव दत्त मंदीर येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन मंजूर झालेल्या माणगांव दत्त मंदीर येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगांव मुख्य रस्ता ते माणगांव दत्त मंदीर रस्त्यावर पूल मंजूर केले असून त्यासाठी ७० लाख ६९ हजार रु. चा निधी मंजूर केला आहे. या कामाचे आज भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेच्या पर्यटन स्थळ विकास निधीतून हा निधी मंजूर केला आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत यांनीही या कामासाठी पाठपुरावा केला होता.
माणगांव दत्त मंदीर कडे जाण्यासाठी हे महत्वपूर्ण पूल आहे. येथे असलेला जुना पूल कमी उंचीचा असून तो जीर्ण झाला होता.शिवसेना पदाधिकारी,ग्रामस्थ व दत्तभक्तांकडून नवीन पुलाची मागणी करण्यात आली होती.पूल मंजूर झाल्याने माणगाव येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक,ग्रामस्थ व दत्तभक्तांकडून आभार मानण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,पुणेचे माजी नगरसेवक सागर माळकर,माजी जी. प. सदस्य राजू कवीटकर,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,रामभाऊ धुरी,नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, सचिन काळप,स्वप्नील शिंदे, बाळा पावसकर, अमित राणे,बंड्या कुडतरकर,कौशल जोशी,बापू बागवे,रुपेश धारगळकर, मनीषा भोसले,एकनाथ धुरी,सचिन भिसे,शैलेश विरनोडकर, गुरू माणगावकर,अजित करमळकर,शंतनू शुरी,उमेश देसाई,गणेश घाडी, दत्तमंदिर देवस्तान कमिटी चे अध्यक्ष सुभाष भिसे,संचालक एम डी चव्हाण,दिलीप म्हाडगुत,सुभाष देवळी,रुपेश नानचे,निखिल भर्तू,अजित परब सर,साई नार्वेकर, फिदालीस डोन्टस, ज्ञानबा कुडतरकर,प्रथमेश तामाणेकर,विवेक वारंग, सद्गुरू घवनळकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा